उपकेंद्र निंबुत ( ता बारामती ) येथे पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ.
सोमेश्वरनगर - रविवार दि 27 रोजी आरोग्य उपकेंद्र निंबुत ( ता बारामती ) पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ आरोग्य व बांधकाम सभापती जिल्हा परिषद पुणे मा प्रमोद काकडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी बारामती पंचायत समिती सभापती निता फरांदे , बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, आरोग्य केंद्र होळ चे वैद्यकीय अधिकारी डॉ ज्ञानदीप राजगे उपस्थित होते , प्रा आ केंद्र होळ कार्यक्षेत्र डॉ ज्ञानदीप राजगे, डॉ प्रज्ञा खोमणे ,डॉ कर्णवीर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज. पाच हजार 497 बालकांना पोलिओ लसीकरण करण्यात आले यासाठी 43 पोलिओ बूथ उभारण्यात आले होते व दोन मोबाईल टीम करण्यात आल्या होत्या तसेच शनिवार दिनांक 26 रोजी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येऊन 138 बालकांना लसीकरण करण्यात आले यासाठी प्रा आ केंद्र होळ मधील सर्व आरोग्य कर्मचारी तसेच अंगणवाडी व आशा कार्यकर्ती असे सर्व मिळून 103 कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.