महाशिवरात्रीदिनी करंजे येथील श्री क्षेत्र सोमेश्वर शिवलिंगची रात्रीची महापूजा प्रांतअधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या शुभहस्ते संपन्न.
सोमेश्वरनगर - बारामती तील प्रसिद्ध श्री क्षेत्र सोमेश्वर शिवलिंग मंदिर करंजे येथे सोमवारी रात्री ची महापूजा बारामती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, सपत्नीक यांच्या शुभहस्ते संपन्न झाली पुरोहित म्हणून मुकेश भांडवलकर व ऋषिकेश घोलप होते
याप्रसंगी बारामती तालुका राष्ट्रवादी पक्ष अध्यक्ष संभाजी होळकर ,अँड गणेश आळंदीकर, प्रणाली शिक्षण संस्था अध्यक्ष बुवासाहेब हुंबरे, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष प्रताप गायकवाड , देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष प्रताप भांडवलकर , सचिव राहुल भांडवलकर ,मोहन भांडवलकर तसेच विविध जिल्ह्यातून आलेले भाविकांसह मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
महाशिवरात्रीनिमित्त सोमेश्वर मंदिर व मंदिर परिसरात विद्युत रोषणाईने रात्रीचा परिसर उजळून गेला होता.
गेले दोन वर्ष सोमेश्वर मंदिर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा भरलेली नव्हती परंतु यावर्षी कोरोना संसर्ग फैलाव कमी झाल्याने शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत यावर्षी चांगली यात्रा भरणार असल्याचे देवस्थान समितीने माहिती दिली .
मंदिर व मंदिर परिसरात खेळणे वाले, मिठाईवाले , हॉटेल ,गृहपयोगी वस्तू , लहान मुलांचे खेळणे पाळणे ने परिसर गजबजून गेला आहे.