इंदापूर तालुका प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ
वालचंद नगर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये अवैध धंदे तात्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी एडवोकेट बापूसाहेब साबळे अंथुर्णे व श्री महेश सुनील चव्हाण लासुर्णे हे दि.25 फेब्रुवारी 2022 रोजी पासून वालचंदनगर पोलीस स्टेशन यांच्यासमोर बेमुदत उपोषण बसलेले आहे निवेदनामध्ये त्यांनी पावडर मिश्रित ताडी मटक्याच्या चिठ्ठ्या फाडणे देशी विदेशी दारू च्या कॉटर्स विकणे तसेच जुगार अड्डे बेकायदेशीर वाळू मात्र तेजस सुरू आहे सदर अवैध धंद्या मुळे लहान मुले महिला व अबलावृद्धांना नाहक त्रास सोसावा लागत आहे तसेच सदर बेकायदेशीर धंद्यामुळे गोळा केला जात असलेल्या अमाप पैशातून गुंडगिरी प्रवृत्तीला चालना मिळत आहे या धंद्यांच्या आहारी जाऊन कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत व होत आहेत अर्जदार यांनी अवैध धंदे यांच्याविरोधात या अगोदर देखील आंदोलन केले होते परंतु सदर धंदे तात्पुरते बंद केले गेले परंतु ते पुन्हा नव्याने सुरू झालेले आहेत तसेच पोलीस स्टेशनच्या हद्दीत अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या घरावर दरोडा पडत असताना व सदर व्यक्तीने पोलीस स्टेशनला दरोड्याची कल्पना दिलेली असताना देखील पोलिस वेळेवर पोहोचत नाहीत मग सर्वसामान्य जनतेने सुरक्षेची अपेक्षा कोणाकडे करावी कारण दरोड्यातील आरोपी अद्याप पकडले गेलेले नाहीत असे त्यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे निवेदन माहितीसाठी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक पुणे अप्पर पोलीस अधीक्षक बारामती व उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांना देण्यात आले