Type Here to Get Search Results !

शिवछत्रपती क्रीडापीठातंर्गत विविध क्रीडाप्रबोधिनीमध्ये प्रशिक्षणासाठी खेळाडूंना निवासी आणि अनिवासी प्रवेश

शिवछत्रपती क्रीडापीठातंर्गत विविध क्रीडाप्रबोधिनीमध्ये प्रशिक्षणासाठी खेळाडूंना निवासी आणि अनिवासी प्रवेश

पुणे, दि. 8: राज्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याकरिता प्रतिभावंत खेळाडूंची निवड करुन क्रीडाप्रबोधिनींच्या अंतर्गत खेळाडूंना शास्त्रोक्त प्रशिक्षण, शिक्षण, भोजन, निवास, क्रीडासुविधा देण्यात येत आहेत. राज्यातील क्रीडाप्रबोधिनीमध्ये सरळ सेवा प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचण्याद्वारे निवासी व अनिवासी खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार आहे,

क्रीडाप्रबोधिनीमध्ये आर्चरी, ज्युदो, हॅन्डबॉल, ॲथलेटीक्स, बॉक्सींग, बॅडमिंटन, शुटींग, कुस्ती, हॉकी, टेबल टेनीस, वेटलिफ्टींग, जिम्नॅस्टीक्स हे खेळप्रकार समाविष्ट आहेत. सरळ प्रवेश प्रक्रियेंतर्गत क्रीडाप्रबोधिनीमध्ये समाविष्ट खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेल्या 19 वर्षाच्या आतील वयाच्या खेळाडूला संबधीत खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित केला जातो. खेळनिहाय कौशल्यचाचणीअंतर्गत क्रीडाप्रबोधिनीमध्ये समाविष्ट खेळात राज्यस्तरावर सहभागी व 19 वर्षाच्या आतील वयाच्या खेळाडूंची खेळनिहाय कौशल्यचाचणी आयोजन करुन गुणानुक्रमे प्रवेश दिला जाईल.

अनिवासी क्रीडाप्रबोधिनीमध्ये प्रवेशाकरिता अधिकृत राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम, द्वित्तीय, तृत्तीय स्थान प्राप्त करणाऱ्या  खेळाडूंना प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. 

प्रवेशासाठीच्या चाचण्यांसाठी पात्र खेळाडूंनी विहित नमुन्यातील अर्जासोबत जन्मतारखेचा दाखला, आधार कार्ड, क्रीडाप्रमाणपत्रे जोडून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे येथे १८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत सादर करावेत.

अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे ०२०-२६६१०१९४ क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकते - ९९२३९०२७७७, क्रीडा मार्गदर्शक महेश चावले- ९३७०३२४९५०, श्रीमती शिल्पा चाबुकस्वार - ९५५२९३१११९ यांना कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test