बारामती दि. १८: विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मयुरेश्वर मंदिरात श्रींचे दर्शन घेऊन देवस्थान परिसर विकास आणि भाविकांना द्यावयाच्या सोयी सुविधाबाबत आढावा घेतला.
यावेळी तहसीलदार विजय पाटील, मोरगावचे सरपंच निलेश केदारे, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विनोद पवार, माजी सरपंच पोपट तावरे आदी उपस्थित होते.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, तिर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत भक्तनिवास, रस्ते, अन्नसत्र हॉल व इतर मूलभूत सोइ सुविधासाठी आवश्यकता लागणारा निधी मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू असून अष्टविनायक तीर्थक्षेत्राचा लवकरच कायापालट झालेले असेल . यामुळे भावीक व पर्यटकांना अधीकाधीक उत्कृष्ट सेवा मिळण्यास मदत होईल. देवस्थान प्रशासनाने आणि शासकीय अधिकाऱ्यांनी मंदिरात येणाऱ्या भाविकांना चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना त्यांनी केल्या.