डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती( ट्रस्ट), इंदापूर च्या वतीने शिवजयंती भव्यदिव्य साजरी होणार. - अॅड राहुल मखरे
इंदापूर प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ
इंदापूर - इंदापूर शहरात सालाबाद प्रमाणे या ही वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती ट्रस्ट, इंदापूर यांच्या वतीने कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा होणार असल्याची माहिती अॅड. राहुल मखरे यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती ट्रस्ट, इंदापूर हे 2015 साली दिवंगत नेते पँथर रत्नाकर (तात्या) मखरे यांनी स्थापन केले होते. आदरणीय तात्या दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करत होते. अॅड. राहुलजी मखरे यांचे विनंतीला मान देऊन शिवजन्मोत्सव कार्यक्रमासाठी मा. खासदार संभाजीराजे भोसले कोल्हापूर, मा. कोरणेश्वर आप्पा स्वामी लिंगायत धर्मगुरु कर्नाटक, मा. पांडुरंग गायकवाड गोविंद गोपाळ महार वडु बुद्रुक यांचे वंशज, मा. अॅड. बाळासाहेब देशमुख ज्येष्ठ विधिज्ञ उच्च न्यायालय मुंबई हे उपस्थित राहणार आहेत. कोरोना च्या काळामध्ये तात्यांचे दुःखद निधन झाल्यामुळे तात्यांनी सुरु केलेली शिवजयंती अखंडित पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांचे चिरंजीव बहुजन मुक्ती पार्टी चे राष्ट्रीय महासचिव अॅड. राहुल मखरे यांनी वडीलांची समतेची परंपरा जपत शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून युगेंद्रदादा पवार खजिनदार विद्या प्रतिष्ठान बारामती, प्रमुख पाहुणे म्हणून मा. आमदार यशवंत (तात्या) माने मोहोळ विधानसभा, मा. आप्पासाहेब जगदाळे, मा शकुंतला रत्नाकर मखरे उपस्थित राहणार आहेत. जेतवन बुद्धविहार, आंबेडकरनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांच्या हस्ते होणार आहे. मिरवणूक नेहरू चौक -खडकपुरा -पुणे सोलापूर हायवे या मार्गाने नगरपालिका मैदान या ठिकाणी मिरवणूक पोहचेल.
सायंकाळी 07:00 वा. नगरपालिकेच्या मैदानावर शिवशाहीर राजेंद्र कांबळे खुडुसकर यांचा शाहिरी जलस्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी दि. 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 07:00 वा. नगरपालिका मैदान या ठिकाणी विजय सरतापे यांचा गायनाचा कार्यक्रम व इतिहास तज्ञ डॉ. श्रीमंत कोकाटे सर यांचा जाहीर प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी मगन ससाणे राष्ट्रीय अध्यक्ष इम्पा, मिलिंद मोहिते, गोरखनाथ वेताळ राष्ट्रीय प्रभारी प्रोटॉन, डी. एन. जगताप उपाध्यक्ष - राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, पुणे, तहसीलदार श्रीकांत पाटील, पो. नि. तयुब मुजावर, गटविकास अधिकारी विजयकुमार परिट, मुख्याधिकारी रामराजे कापरे, नगराध्यक्षा अंकिता शहा, गोरक्ष बारवकर, प्रताप (आबा) पाटील, भरत (शेठ) शहा, मा. सुरज धाईंजे महेंद्र रेडके, दीपक जाधव, हनुमंत कोकाटे, वसंत साळवे, बाळासाहेब वाघमारे, सचिनभाऊ बनसोडे, अमोल लोंढे, अनिकेत जाधव, रघुनाथ गोपणे, लालासाहेब कांबळे, आनंदराव थोरात, किशोर साळुंखे, कैलास चव्हाण, भारत दादा अहिवळे, अंकुश सोनवणे, अॅड. सचिन टकले, अॅड. समीर टिळेकर, गोपीचंद गलांडे वर्धमानशेठ शहा, महारुद्र पाटील, कैलास कदम, आर आर बामणे, बाळासाहेब सरवदे, संजय देहाडे, विलास शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती अॅड. राहुल मखरे यांनी दिली.