Type Here to Get Search Results !

मळशी येथे माघी गणेश जयंती उस्तव सोहळा उत्साहात संपन्न..

मळशी येथे माघी गणेश जयंती उस्तव सोहळा उत्साहात संपन्न..

सुर्यमुखी गणेश मंदिर - मळशी

सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वाणेवाडी तील मळशी येथे असणाऱ्या सुर्यमुखी गणेशाच्या मंदिरात माघी गणेश जयंती उस्तव सोहळा निमित्त गणेश मंदिर आकर्षक फुलांनी सजावट करत दर वर्षी मोठ्या उत्साहात संपन्न होत असते      त्यानुषंगाने सुख समृद्धीचा वर्षाव करत, तसेच सकाळपासून मंदिरात कीर्तनाच्या टाळांचा नाद घुमवत. नवचैतन्याचा गुलाल उधळत  माघी गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.शुक्रवार दि 4 रोजी  पहाटे 4.30 पासुन श्री गणेश अभिषेक, श्री गणेश भंडारा,तसेच  दुपारी 12 वाजेपर्यंत  आळंदी येथील प्रसिद्ध ज्योती मतकर यांचे कीर्तन त्यानंतर  श्री गणेश जन्म काळ पाळणा तसेच भाविक भक्तासाठी महाप्रसाद भंडारा आयोजन  करण्यात आले होते ,संध्याकाळी वाणेवाडी-मळशी येथील भजनी मंडळाचे भजन सर्व गणेश भक्तासाठी होत असते.
   तरी या सोहळ्या साठी सोमेश्वरनगर परिसरातील 
ग्रामस्थ मान्यवर , पदाधिकारी आवर्जून  दरवर्षी उपस्थित राहत असतात.
हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी संघर्ष तरुण मंडळ व ग्रामस्थ  यांनी मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test