राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परिसंवाद यात्रा कार्यक्रमाचं नियोजन प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न.
पुणे,माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे जिल्हा, आदरणीय अजित पवार तसेच संसदरत्न खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांतजी वरपे यांच्या सूचनेनुसार नियोजित राष्ट्रवादी परिसंवाद यात्रा कार्यक्रमाचं नियोजन प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन करण्यात येत आहे, तरी काल मुळशी तालुक्यातील युवक व जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यावेळी मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष, सागर साखरे तसेच युवकचे सर्व पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका व जिल्हा स्तरावरील सर्व पदाधिकारी यांच्या सोबत सविस्तर चर्चा करून पुढील रणनीती ठरविण्यात आली.