जनता सुज्ञ आहे वेळ येतात धडा शिकवेल-ना.जयंत पाटील,दिल्ली समोर मोडेल पण वाकणार नाही -खासदार सुप्रियाताई सुळे
इंदापूर तालुका प्रतिनिधी- दत्तात्रय मिसाळ
इंदापूर - सत्तेचा दुरुपयोग विरोधक कसा करतात हे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या वरून दिसून येत आहे, असा आरोप राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इंदापूर येथील परिसंवाद कार्यक्रमात बोलताना केला आहे.
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले आतापर्यंत विरोधकांनी सूडाचे राजकारण सुरू केले आहे अनेक सरकारे आली आणि गेली कोणीही सत्तेवर आले तरी असे कायम टिकत नाही सध्या सुडाचे राजकारण चालू आहे विरोधात बोलणार्यांना तपास यंत्रणा मार्फत अटक करून कारवाई करण्याचा प्रकार विरोधकांनी चालू केला आहे याबाबत जनता सुज्ञ आहे वेळ येताच जनता धडा शिकवेल असे म्हणत जयंत पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
दिल्ली समोर मोडेल पण वाकणार नाही खासदार सुप्रिया सुळे
अमित शहांना माझे दोन प्रश्न आहेत विरोधात असले कि ईडी लावता आणि तुमच्या पक्षात आले कि ईडी गायब होते.कोणते औषध वापरतात ते सांगा असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी शहा यांना सवाल केले आहेत. डीडी चा पेपर फक्त त्यांच्यावर कारवाई का होत नाही?महाराष्ट्र खूप अडचणीच्या काळात चालला आहे दिल्लीची माणस महाराष्ट्राचा अपमान करत आहेत पण दिल्ली समोर मोडेल पण वाकणार नाही असे सुप्रिया सुळे यांनी ठणकावले आहे.
पाणी प्रश्न सोडवा-राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे
यावेळी राज्यमंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना इंदापूर तालुक्यातील पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी केली तसेच लाकडी निंबोडी योजनेला मंजुरी दिल्याबद्दल अभिनंदन केले.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,मेहबूब शेख,प्रदीप गारटकर,दशरथ माने,सक्षणा सलगर रविकांत वरपे,करण कोकणे,हनुमंत कोकाटे,अतुल झगडे,प्रताप पाटील,प्रशांत पाटील,हनुमंत बंडगर, अभिजित तंबिले,बाळासाहेब ढवळे,सतीश पांढरे, बाळासाहेब करगळ,सागर मिसाळ,सचिन सपकाळ,छाया पडळकर,नानासाहेब नरोटे,शुभम निंबाळकर,सचिन खामगळ,सागर व्यवहारे,विष्णू पाटील,विशाल मारकड,संजय देवकर,धनंजय तांबिले,सुभाष डंरगे,शिवाजी जगताप,तात्यासाहेब जाधव, रावसाहेब गवळी आदी उपस्थित होते.