इंदापूर - बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. संदिप ताजणे साहेब यांच्या दिशा निर्देशानुसार आज दौंड विधानसभेची संघटन बांधणीसाठी मिटींग आयोजित केली होती. या मिटींगला प्रमुख मार्गदर्शक- अजित ठोकळे ( प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य) हे उपस्थित होते नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीची विधानसभेतील कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली बैठकीमध्ये दौंड विधानसभेची कार्यकारणी जाहीर करण्यात आली तसेच आगामी काळातील नगरपालिका व पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूका संपूर्ण ताकतीने लढून सर्वच्या सर्व उमेदवार उभा करण्यासाठी पक्षाचा नविन कार्यक्रम आखण्यात आला बहुजन समाज पार्टीच्या पक्षाच्या संघटन बांधणी कङे कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे आणि उमेदवारांची चाचपणी करून वरिष्ठांकडे त्याची माहिती द्यावी असे बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र प्रदेश सचिव मा. अजित ठोकळे यांनी कार्यकर्त्यांना निर्देश दिले या बैठकीमध्ये उपस्थितांमध्ये जिल्ह्याचे सचिव उमाकांत कांबळे विधानसभा अध्यक्ष श्रीकांत सोनवणे उपाध्यक्ष तुषार सवणे महासचिव गोरख ननवरे कोषाध्यक्ष अमन खान .राहुल कंकाळे बीव्हिएफ .विश्वदीप सूर्यवंशी बामसेफ .वरिष्ठ नेते एडवोकेट अनिल कांबळे धनंजय पोळ आणि बैठकीला बहुजन समाज पार्टीचे जुने-नवे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते