शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या ज्युदो, कराटे स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा राजवर्धन पाटील यांच्या हस्ते गौरव
इंदापूर तालुका प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ
इंदापूर - किंग फायटर कुडो स्पोर्ट अकॅडमी व आनंद मखरे परिवाराच्या वतीने शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या ज्युदो,कराटे स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला इंदापूर, अकलूज, बारामती तालुक्यातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला.
राजवर्धन पाटील यांचा वाढदिवस देखील यावेळी साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक किंग फायटर कुडो स्पोर्ट अकॅडमीचे अध्यक्ष किरण राऊत यांनी केले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडिया इंदापूर शहराध्यक्ष आनंद मखरे, नगरसेवक कैलास कदम, माळवाडी नंबर 2 चे उपसरपंच दत्तात्रेय पांढरे, पुणे जिल्हा नाभिक समाजाचे अध्यक्ष रमेश राऊत, कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके, शंकरभाऊ चोरमले, पोलीस उपनिरीक्षक जाधव मॅडम, मनीष जाधव, मयूर मखरे, शुभम मखरे यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार शिंदे यांनी केले.