संत गाडगे महाराज यांना प्रशासनातर्फे अभिवादन
बारामती दि. 23 : संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी तहसिल कार्यालयात संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी निवासी नायब तहसिलदार विलास करे, नायब तहसिलदार महादेव भोसले, पी.डी.शिंदे, डॉ.भक्ती सरवदे- देवकाते, यांच्यासह तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.