राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास यांच्याशिवाय शिवाजीला कोण विचारेल? असे समाज भावना दुखावणारे वक्तव्य केल्याबद्दल बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला
बारामती: छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नसताना राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास यांच्याशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल असे समाजमन दुखावणारे आक्षेपार्ह वक्तव्य होते. राज्यपालांच्या या वक्तव्याचा बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आक्षेप घेत बारामती तहसील कार्यालय याठिकाणी जाहीर निषेध नोंदवून नायब तहसीलदार महादेवराव भोसले यांना निषेधाचे निवेदन दिले.
महाराजा चक्रवती सगळे झाले.
चाणक्य शिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल,समर्थशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही प्रत्येकाच्या मागे आईचे मोठे योगदान असतं तसेच आपल्या समाजात गुरुचे स्थान मोठे असते. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटले की तुमच्या कृपेने मला राज्य मिळाले आहे,असे वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिनांक १६ जुलै २०१८ रोजी दिलेल्या निकालानुसार तपास अधिकाऱ्यांनी व इतिहास तज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही. शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यामध्ये गुरू-शिष्याचे नाते असल्याचे देखील कोणताही पुरावा उपलब्ध नाही असे असताना देखील राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट झाल्याची व गुरू-शिष्याचे नाते असल्याचे सांगत समर्थशिवाय शिवाजीला कोणी विचारेल असे आक्षेपार्ह व समाज भावना दुखावणारे वक्तव्य केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून निषेधाचे निवेदन बारामती नायब तहसीलदार महादेवराव भोसले यांना देण्यात आले.
बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत कोणताही पुरावा उपलब्ध नसताना युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी समर्थ भेटीची चुकीची माहीती औरंगाबाद दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात दिल्याने नाराजी व निषेध व्यक्त केली आहे.
यावेळी बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर,बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल वाबळे,शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमर धुमाळ,पुणे जिल्हा समाजकल्याण दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य साधु बल्लाळ, बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे कार्याध्यक्ष विशाल जाधव, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे अध्यक्ष ॲड.रवींद्र माने,बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा वनिता बनकर, शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा अनिता गायकवाड,बारामती तालुका सोशल मिडियाचे अध्यक्ष सुनिल बनसोडे,शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा आरती शेंडगे, बारामती तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा भाग्यश्री धायगुडे, सुनिता मोटे,रेहाना शेख, राजेश वाघ आदींसह महिला व युवक कार्यकर्ते उपस्थित होते.