Type Here to Get Search Results !

बारामतीतील मळद येथे हरभरा व सोयाबीन पिकाविषयक शेतीशाळा संपन्न

बारामतीतील मळद येथे हरभरा व सोयाबीन पिकाविषयक शेतीशाळा संपन्न
       
बारामती  : महाराष्ट्र शासन कृषि विभाग, बारामती यांच्या मार्फत मळद येथे  हरभरा काढणी पश्चात व्यवस्थापन व उन्हाळी सोयाबीन पीक लागवड व्यवस्थापन कार्यक्रम  पार पडला. 
कार्यक्रमास तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल,  मंडळ कृषि अधिकारी चंद्रकांत मासाळ, आघारकर संशोधन केंद्र  होळ  चे शास्त्रज्ञ डी. एस. साळुंके,  संतोष जायभाय, बळीराम फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, नानासाहेब गावडे,  गावातील प्रगतिशील शेतकरी, कृषि सहायक  मनीषा काजळे आदी  उपस्थित होते.
 यावेळी तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी  खपली गहू लागवड,  व्यवस्थापन व खपली गव्हाचे पोषणमूल्य  याबाबत मार्गदर्शन केले. 
आघारकर संशोधन केंद्राचे अध्यक्ष डी. एस. साळुंके यांनी हरभरा काढणी पश्चात व्यवस्थापन व बाजार भावबाबत सखोल मार्गदर्शन  केले. तर उन्हाळी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान याबाबत चे मार्गदर्शन एस जायभाय यांनी केले.
 बळीराम फार्मर्स प्रोड्युसर कंपनी चे अध्यक्ष  बाळासाहेब तावरे यांनी त्यांचे सोयाबीन बीजोत्पादनातील स्वंअनुभवाविषयी शेतकरी बांधवांशी चर्चा केली.
 ई-पीक पाहणी करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे. 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या मोबाईल अँप द्वारे पीक नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन  मंडळ कृषि अधिकारी चंद्रकांत मासाळ यांनी  यावेळी शेतकरी बांधवांना केले.
                                             

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test