"श्रीमंत अंबामता ग्रामस्थ मंडळ" च्या वतीने
शिवजयंती उत्सवाचे आयोजन.
सोमेश्वरनगर - महाराष्ट्र तर होत असलेली दरवर्षीप्रमाणे साजरी करण्यात येणारी शिवजयंती बारामतीतील वाघळवाडी येथे १९ फेब्रुवारी रोजीची शिवजयंती शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत साजरी करण्यात येणार आहे.
वाघळवाडी सोमेश्वरनगर (ता बारामती) येथील "श्रीमंत अंबामता ग्रामस्थ मंडळ " च्या वतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १६ फेब्रुवारी रोजी किल्ले सिंधदुर्ग येथे अंबामाता मंदिर येथून प्रस्थान करण्यात येणार असून ज्योतीची मशाल घेऊन सर्व मंडळातील सदस्य धावत ज्योत वाघळवाडी गावात घेऊन येणार आहेत.
ज्योतीचे आगमन होताच १९ फेब्रुवारी रोजीची रॅली चे आयोजन निरा ते सोमेश्वर कारखाना येथे शिवरायांच्या अशरूढ पुतळ्यास पुष्पहार घालून वाघळवाडी येथे ज्योतीचे आगमन होणार आहे.
हे मंडळ दरवर्षी विविध उपक्रम राबवत शिवजयंती साजरी करत असते तसेच २० फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिर तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे.