Type Here to Get Search Results !

आज सोन्याच्या भावाने 50 हजारांचा टप्पा ओलांडला-राज्य समन्वयक किरण आळंदीकर

आज सोन्याच्या भावाने 50 हजारांचा टप्पा ओलांडला-राज्य समन्वयक किरण आळंदीकर 
 सोमेश्वरनगर - सोन्याचे दर कमी होतील अशी अपेक्षा असताना आज अचानक तोळ्यामागे 1200 रुपयांची वाढ होऊन भारतीय बाजारामध्ये 50 हजार 100 रुपये  इतका सोन्याचा भाव झाला.
या बाबत " इंडिया बुलियन & ज्वेलर्स " असोसिएशन चे राज्य समन्वयक किरण आळंदीकर यांचेशी संपर्क केला असता त्यांनी सोन्याचे भाव वाढण्यामागची कारणमिमांसा सांगितली..
आळंदीकर म्हणाले सध्या जगामध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.. रशियाने युक्रेन च्या सीमेवर सैन्यांची जमवाजमव सुरु केली असून युक्रेनवर रशियाने दबाव वाढवला आहे, रशियाकडे सध्या सोन्याचा साठा देखील मोठ्या प्रमाणात आहे, जगामध्ये कोणत्याही दोन देशांमध्ये जेंव्हा युद्ध सदृश परिस्थिती निर्माण होते त्यावेळी भीतीचे सावट निर्माण होऊन, सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होते परिणामी सोन्याच्या भावावर परिणाम होऊन भाववाढ होते.
या शिवाय काल शेअर बाजारावर परिणाम होऊन सव्वा टक्क्यापेक्षा जास्त शेअर बाजारामध्ये घसरण झाली याचा देखील थोडा फार परिणाम झाला.
आगामी काळात फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यात मुंबई, बेंगलोर, पुणे या ठिकाणी जागतिक पातळीवरील दागिन्यांची भव्य प्रदर्शने होत असून, या प्रदर्शनासाठी देखील मोठ्या प्रमाणात सोन्याची मागणी होत आहे त्यामुळे सोन्याचा तुटवडा निर्माण झाल्याचा देखील परिणाम सोन्याच्या भाववाढीवर झाला असल्याचे किरण आळंदीकर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test