माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते विशाल जाधव यांची भैरवनाथ पाणी वापर संस्था 43 फाटा लासुर्णेच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल सत्कार
इंदापूर - विशाल हनुमंत जाधव यांची भैरवनाथ पाणी वापर संस्था 43 फाटा लासुर्णेच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी इंदापूर अर्बन बँकेचे संचालक उल्हास जाचक, इंदापूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक विजय मचाले,साहिल चव्हाण उपस्थित होते.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे यावेळी विशाल जाधव यांनी सांगितले.