Type Here to Get Search Results !

पक्क्या अनुज्ञप्तीचा कोटा 22 फेब्रुवारी रोजी उपलब्ध

पक्क्या अनुज्ञप्तीचा कोटा 22 फेब्रुवारी रोजी उपलब्ध 
पुणे,दि.14 : पिंपरी-चिंचवड येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत लोणावळा शहरात पक्क्या अनुज्ञप्तीचा कोटा वाढविण्यात आला असून 22 फेब्रुवारी रोजी कोटा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

पिंपरी-चिंचवड येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांकरिता  www.parivahan.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या कोट्यामध्ये वाढ करून 22 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी ५ वाजता कोटा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लोणावळा शहरातील तुंगार्ली नगरपालिका शाळेत 25 फेब्रुवारी राजी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अर्जदाराने निश्चित वेळ घेऊन पक्क्या अनुज्ञप्तीसाठी उपस्थित राहावे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळवले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test