पुणे, दि.१३ : पुणे शहर हद्दीतील आळंदी-मरकळ, तुळापुर-फुलगाव, लोणीकंद- थेऊर- लोणीकाळभोर - वडकी - उंड्री कात्रज मार्गावरील तुळापुर येथील इंद्रायणी नदीवरील मोठा पुल धोकादायक झाला असल्याने अत्यावश्यक सेवेतील वाहनाशिवाय (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी.) जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग म्हणुन शिक्रापूर ते चाकण किंवा विश्रांतवाडी ते आळंदी या मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पुणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उप-आयुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.