Type Here to Get Search Results !

शेयर मार्केट विषयी समज गैरसमज...!

शेयर मार्केट विषयी समज गैरसमज...!
शेयर मार्केट हा एक असा विषय किंवा नॉलेज कि शेयर मार्केट तुम्हाला खूप आर्थिक प्रगती करवून देऊ शकतो. परंतु आजकाल कोणीही उठतं आणि शेयर मार्केट मध्ये अकाउंट काढून ट्रेडिंग सुरु करतो. याचा परिणाम असा होतो कि काहीही नॉलेज नसताना ट्रेडिंग केल्यावर परिणामी नुकसानच होण्याची दाट शक्यता असते किंवा मोठे नुकसान होते. शेयर मार्केट मध्ये पाऊल ठेवण्या आधी किमान बेसिक नॉलेज असणे खूपच आवश्यक असते. तरच शेयर मार्केटचा विचार  करावा. खरंतर मार्केट मध्ये काम करावयाचे असल्यास प्रॉपर नॉलेजची खूपच गरज असते.
कारण काही लोक काय करतात कि थोडेसे नॉलेज घेतात किंवा अपूर्ण नॉलेज घेतात आणि ट्रेडिंग सुरु करतात त्याचा खूप मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. कारण काहीही नॉलेज नसण्यापेक्षा अर्धवट नॉलेज खूपच घातक असत. याचाही विचार गांभीर्याने केला पाहिजे असे शेयर मार्केट तज्ञ अभिजीत ननवरे म्हणाले.                                                                                                                जेव्हा आपण एखादा शेयर विकत घेत असतो त्या शेयरवर स्टडी करणे खुपच गरजेचे असते त्या शेयरचा इतिहास तपासणे, त्याचा फंडामेंटल तपासणे गरजेचे असते. ज्या शेयरची कंपनी असते त्या कंपनीचा इतिहास ती कंपनी प्रॉफिटमध्ये किती आहे व त्याचा व्हॉल्युम चेक करने गरजेचे असते तो शेयर वर जाणार का खाली जाणार याचा अभ्यास करणे गरजेचे असते. त्यामुळे शेयर मार्केटचे पूर्ण आकलन करणे गरजेचे असते. शेयर मार्केट मध्ये परफेक्ट बनायचे असल्यास किमान चार्ट अनालायसिस जमणे अत्यंत गरजेचे असते. त्यातूनही  टेक्निकल नॉलेज घेणे हे अत्यंत फायदेशीर काम करावयास मदत करते. शेयर मार्केटचा एवडा सगळा अभ्यास केल्यानंतरही मार्केटमध्ये आवश्यक असणारी  गोष्ट म्हणजे प्रॅक्टिस. आपण मार्केटमध्ये ट्रेड टाकण्याआधी खूप सारी प्रॅक्टिस असणे आवश्यक असते. त्यासाठे पेपर ट्रेडिंग केली तरी चालू शकते.त्यामुळे आपले अनालायसिस बरोबर आहेका हे कळू शकते आणि आपला लॉस होण्याचेहि टाळते.                       
  शेयर मार्केटमध्ये पैसे गुंतवताना कशा प्रकारे पैसे गुंतवायचे आणि कसले पैसे गुंतवायचे याचाहि अभ्यास करणे गरजेचे असते. कारण  बरेचशे लोक लोन काढून किंवा पैसे उसने घेऊन शेयर मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करतात. परिणामी मार्केटने जर रिटर्न चांगले दिले नाही तर  इन्व्हेस्टर खूपच अडचणीत येतो. म्हणून मार्केट मध्ये पैसे गुंतवताना नेहमी आपल्याला न लागणारे पैसे किंवा बँकेत पडून असणारे पैसे इन्व्हेस्ट करावे. काही लोकांना माहिती असते कि आपल्याला नॉलेज नाही मग हे लोक अडवायजरी घेने पसंत करतात. परंतु बऱ्याच अडवायजरी फेक असल्यामुळे हे लोक तिथेही आपले खुप मोठे नुकसान करून घेतात. म्हणून मार्केटमध्ये स्वतः परफेक्ट बनणे हाच एकमेव पर्याय आहे. मार्केटच्या चड व उतारामध्ये कसा फायदा करून घेयचा याचे नॉलेज शेयर मार्केटचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर कळते. 
परंतु हा लेख खूप मोठा होईल त्यामुळे इथेच थांबतो. असे एका मुलाखतीत शेयर मार्केट तज्ञ अभिजीत ननवरे म्हणाले. 
 ---- शब्दांकण-अभिजित ननवरे ----

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test