'निंबुत' च्या कन्येचा अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे कुस्ती स्पर्धेत डंका.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील निंबुत येथील कै.रघुनाथ दगडोबा काकडे-देशमुख यांचे नातू राहुल रत्न सिंह काकडे -देशमुख कामानिमित्ताने अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे स्थायिक आहेत
कु. रितिका राहुल काकडे- देशमुख हिने शनिवारी दिनांक 29 जानेवारी 2022 रोजी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे संपन्न झालेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत 14 वर्ष वयोगटात 65 किलो वजन गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून वॉशिंग्टन राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी तिची निवड झाली पुढील वाटचालीस तिला निंबुत करांनी व सोमेश्वरपंचक्रोशीतील कुस्तीप्रेमींनी शुभेच्छा दिल्या व तिचे अभिनंदन केले.