इंदापूर तालुक्यात चांगली निर्मिती होत असल्याचा अभिमान-दत्तात्रय भरणे
इंदापूर - राज्यमंत्री श्री. भरणे म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन प्रणालीचा घटक म्हणून याप्रकारच्या वाहनांचे इंदापूर तालुक्यात उत्पादन होत आहे, अभिमानाची बाब आहे. येत्या काळात अशा उद्योगासाठी सहकार्य करण्यात येईल.
यावेळी स्वतःचे जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या पुणे मनपाचे सुनील शंकर, ठाणे मनपाचे संतोष कऱ्हाळे आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अरविंद सावंत यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
आर्यन पंम्पस् व्यवस्थापकीय संचालक प्रशांत सुतार यांनी सॅनिटेशन, अत्याधुनिक अग्निशमन, शीघ्र प्रतिसाद वाहनाची प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. बालेवाडी येथे होणाऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र २०२२ या टेनिस स्पर्धेच्या चषकाचे अनावरणही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे, अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, परिसरातील नागरिक उपस्थित होते.