भारतीय पत्रकार संघ तालुकाउपाध्यक्ष;संचालक विनोद गोलांडे यांच्या हस्ते प्रणाली शिक्षण संस्था-करंजे प्रांगणात ध्वजारोहण.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी - भारतीय प्रजासत्ताकाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रणाली शिक्षण संस्था करंजे येथील प्रांगणात भारतीय पत्रकार संघाचे बारामती तालुका उपाध्यक्ष तसेच या संस्था संचालक विनोद गोलांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
भारतात 'प्रजासत्ताक दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 26 जानेवारी 2022 रोजी 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या 26 तारखेला भारताचा 'प्रजासत्ताक दिन' साजरा केला जातो. आपला भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. पण देशाची राज्य घटना 26 जानेवारी 1950 रोजी अमलात आली. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसुदा समिती स्थापना केली गेली. म्हणून हा दिवस 'प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा केला जातो.
यावेळी करंजे गावचे माजी सरपंच बाजीराव शिंदे , प्रणाली शिक्षण संस्थाचे संस्थापक अध्यक्ष व करंजे गावचे माजी उपसरपंच बुवासाहेब हुंबरे , संचालक मंडळ तसेच पोलीस पाटील राजेंद्र सोनवणे, मुरलीधर गायकवाड सह ग्रामस्थ उपस्थित होते.
पत्रकार गोलांडे यांनी उपस्थित नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.तर अध्यक्ष हुंबरे यांनी यावर्षी आपण कोरोनाचे नियम पाळत तसेच कमी संख्येत यावर्षीचा प्रजाकसत्ता दिन साजरा केला आहे, तसेच उपस्थितांचे आभार ही मानले.