पत्रकार दिनाचे औचित्य साधत भारतीय पत्रकार संघाचे संपर्क कार्यालय सुरू
सोमेश्वरनगर - आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी मराठीतील पहिले दर्पण हे नियतकालिक सुरु केले. त्याचं स्मरण म्हणून महाराष्ट्रात ६ जानेवारी हा दिवस दर्पण दिन किंवा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त
भारतीय पत्रकार संघ बारामती तालुक्याच्या वतीने करंजे याठिकाणी गुरूवार दि. ६ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वा. बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन ज्येष्ठ पत्रकार जयराम सुपेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच बाबुराव पांडुरंग हुंबरे उद्योग संकुलन करंजे येथे भारतीय पत्रकार संघाच्या बारामती तालुका संपर्क कार्यालयाचे उदघाटन वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी भारतीय पत्रकार संघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष तैनुर शेख, बारामती तालुका अध्यक्ष काशिनाथ पिंगळे, प्रणाली ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बुवासाहेब हुंबरे, करंजे येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व भटक्या-विमुक्त राष्ट्रवादी सेलचे बारामती तालुका उपाध्यक्ष प्रताप गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी सोमनाथ लांडेसाहेब, तैनुर शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी भारतीय पत्रकार संघाचे बारामती तालुका उपाध्यक्ष विनोद गोलांडे, सचिव सोमनाथ लोणकर, संघटक महंमद शेख, हल्लाकृती समिती प्रमुख निखिल नाटकर, सहसचिव संतोष भोसले, दिपक जाधव, सचिन पवार, सोमनाथ जाधव, शरद भगत, उमेश दुबे, संभाजी काकडे, जितेंद्र काकडे, महेश चव्हाण आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष काशिनाथ पिंगळे, सूत्रसंचालन विनोद गोलांडे यांनी तर आभार शरद भगत यांनी मानले.