बारामती - अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिअशनच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रा.अमित विलासराव पोंदकुले यांची निवड झाली आहे या अगोदर त्यांनी अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनच्या बारामती तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहिले.या कामाची दखल घेऊन प्रदेशाध्यक्ष दत्ताजी खराटे उपाध्यक्ष डॉ. पंकज चौधरी प्रदेश सचिव रोहित वाघ यांनी दखल घेतली व त्यांची निवड अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी करण्यात आली ते बारामती तालुक्यातील शिरवली गावचे सुपुत्र आहेत , सध्या ते दत्तकला शिक्षण संस्था च्या अनुसया इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे कार्यरत आहेत. फार्मासिस्ट साठी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिअशन या संघटनेच्या माध्यमातून काम करणार आहोत असे त्यांनी सांगितले.