Type Here to Get Search Results !

होळमध्ये खपली गहू लागवड आणि प्रक्रिया प्रशिक्षण संपन्न

होळमध्ये खपली गहू लागवड आणि प्रक्रिया प्रशिक्षण संपन्न

सोमेश्वरनगर : तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खपली गहू लागवड ते प्रक्रीया प्रशिक्षण कार्यक्रम बारामती कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि होळ येथील आघारकर संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने होळ येथे पार पडला. 

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, आघारकर संशोधन केद्रांचे शास्त्रज्ञ विजेंद्र बाविस्कर, श्री. सुर्वे, यशवंत कुमार, तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, मंडल कृषी अधिकारी हिंदुराव मोरे, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विश्वजित मगर, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश जाधव यांच्यासह कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक तसेच शेतकरी उपस्थित होते.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून आघारकर संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ विजेंद्र बाविस्कर यांनी खपली गहू लागवड करताना घ्यायची काळजी, सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन, हवामानातील बदलानुसार पिकाचे व्यवस्थापन, काढणी पूर्व नियोजन आदींबाबत माहिती दिली. बाजारपेठेत खपली गव्हाची वाढती मागणी, खपली गव्हापासून बनविण्यात येणारे पदार्थ, त्यावर केली जाणारी प्रक्रीया याबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वेर बोटे यांनी कृषी विभागातील आत्माच्या माध्यमातून शेतकरी व शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना 'विक्रेते ते पिकेल' अभियानांतर्गत बाजारपेठेत मागणी असलेल्या पिकाची लागवड व प्रक्रिया प्रकल्प उभारणी करण्याचे आवाहन केले.

पुढील हंगामात लागवड क्षेत्र वाढविण्याचा संकल्प करत आहोत असे तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test