पक्क्या अनुज्ञप्तीसाठी मासिक दौऱ्याचे आयोजन
पुणे दि. 28- फेब्रुवारी 2022 मध्ये पक्की अनुज्ञप्ती मिळण्याच्यादृष्टीने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खेड, मंचर, जुन्नर आणि वडगाव मावळ येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी 1 आणि 2 फेब्रुवारी रोजी खेड, 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी मंचर, 15 आणि 16 फेब्रुवारी रोजी जुन्नर, 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी वडगाव मावळ येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीसाठी 90 एवढा कोटा उपलब्ध असून तो 31 जानेवारी 2022 रोजी सायं. 5 वाजता उपलब्ध होणार आहे.
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर अर्जदारांनी गर्दी टाळण्याच्यादृष्टीने पूर्वी (अपॉईंटमेंट) घेतलेल्या वेळेतच हजर राहावे, तसेच कोरोना विषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.