Type Here to Get Search Results !

माय हरपली !जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

माय हरपली !जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन
महाराष्ट्राची मदर तेरेसा अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता.

जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने ४ जानेवारी २०२२ रोजी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. महिन्यापूर्वीच त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज अखेर त्यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

हजारो अनाथ मुला-मुलींना आश्रय देत त्यांची माय बनलेल्या सिंधुताई यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महिलांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याच्या सुरुवातीस केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test