बारामतीतील वाघळवाडी-सोमेश्वरनगर मध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी अंबामाता महिला ग्रामसंघाची स्थापना.
सोमेश्वरनगर -बारामती तालुक्यातील वाघळवाडी-सोमेश्वरनगर मध्ये महिला सक्षमीकरण करण्यासाठी जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती बारामती व ग्रामपंचायत वाघळवाडी यांच्या वतीने महिला सबलीकरण, सशक्तीकरण करण्यासाठी गावातील ३६ महिला स्वयंसहायता बचत गटांनी एकत्र येत या अंबामाता महिला ग्रामसंघाची स्थापना केली.
महिला ग्राम संघ स्थापन करण्यासाठी व माहिती देण्यासाठी पंचायत समिती तालुका समन्वयक अधिकारी श्री. लांडगे सर उपस्थित होते त्यांनी ग्रामसंघ कसा स्थापन करायचा व त्याचे फायदे तोटे या बाबत सर्व माहिती देऊन व महिलांचे शंकानिरसन करून ग्राम संघ स्थापन केला त्यानंतर झालेल्या मीटिंगमध्ये ग्राम संघाच्या अध्यक्ष म्हणून सरपंच नंदा सकुंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष मालन सावंत, सचिव अनिता शिंदे, व खजिनदार/ लीपिका मनीषा जितेंद्र सकुंडे या सर्वांची मीटिंगमध्ये बिनविरोध निवड करण्यात आली. विविध विषयांच्या कमिटी निवडण्यात आली. या ग्राम संघाच्या सर्व बचत गटातील अध्यक्ष, सचिव या ग्राम संघाच्या सदस्य म्हणून काम पाहतील व सर्व गटांमधील ४५१ महिला या ग्राम संघाच्या सभासद असतील. सरपंच नंदा सकुंडे यांनी ग्राम संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल ग्राम संघातील सर्व सदस्य महिलांचे आभार मानले यापुढे महिला सबलीकरण सशक्तिकरण, गावातील सर्व महिलांचे समस्या समजावून घेणे व त्याचे निराकरण करणे, बँक कर्ज प्रकरण करणे महिलांसाठी अभ्यास दौरे, सहलीचे नियोजन करणे व इतर सर्व कामे ग्राम संघातून या पुढे केली जातील असे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
राष्ट्रवादीच्या महिला तालुका सरचिटणीस सुचिता साळवे यांनी या निवडीचे सर्वांचे स्वागत केले, खासदार सुप्रिया सुळे व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कडून बचत गटांना लागणारी सर्व मदत केली जाईल असे त्यांनी सांगितले.या ग्रामसंघ निवडीसाठी तालुका समन्वयक अधिकारी लांडगे सर, व तालुका गट समन्वयक रेश्मा मगर, कामकाज पाहिले.उपस्थित युवा नेते तुषार सकुंडे होते.
आभार वैशाली रमेश गायकवाड यांनी मानले.
यावेळी HDFC बँक बारामती अधिकारी माधुरी लोंढे यांनी कर्ज प्रकरणाबाबत सर्व माहिती दिली प्रत्येकी बचत गटांना १.५ लाख ते २.५ लाख रुपये कर्ज मंजूर करण्यात येईल व त्याबाबत लागणारे सर्व कागदपत्रांची पूर्तता त्या गावात स्वतः घेऊन पूर्ण करणार आहेत .बँकेकडून कमीत कमी व्याजदर आकारण्यात येतील असे सांगितले.
बचत गट नियमित व वेळेवर कर्जफेड करतील त्या बचत गटांना बँकेकडून ६ % वार्षिक व्याजदराने कर्ज मिळेल त्या रकमेवरील होणारे ६ % व्याज शासनाकडून बचत गटाच्या खात्यावर व्याजाची रक्कम ६ महिन्याच्या आत बचत गटाच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल असे तालुका समन्वयक अधिकारी लांडगे यांनी याबाबत सर्व माहिती त्यांनी दिली.