'सोमेश्वर विद्यालयात' १८ वर्षांनी रंगला माजी विद्यार्थी मेळावा...
सोमेश्वरनगर - बारामतीतील सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर या शाळेतील २००२/२००३ (इयत्ता १० तु. अ.) या कालावधीतील सर्व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवार दि 30 रोजी विद्यालय प्रांगणात विविध कायर्क्रमांनी रंगला. विशेष म्हणजे १८ वर्ष्यानी हे एकत्र आले तसेच उपस्थित विद्यार्थ्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींच्या उजाळा देत केेलेल्या चर्चा व हास्य कल्लोळाने या मेळाव्यात रंगत भरली. तसेच आलेल्या सर्व शिक्षकांचा सन्मान फेटा, शाल पुष्पहार ,पेन- पुस्तक देत त्यांचा सन्मान करण्यात आला तर त्यांच्या हस्ते सोमेश्वर परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले त्याच बरोबर अनेक माजी विध्यार्थ्यांनी व्यासपीठावर येत आपली ओळख सांगत शिक्षण शिकत असताना हायस्कूलमध्ये आलेल्या अडचणी व त्यातून मी कसा घडलो तर त्यावेळी वर्ग शिक्षकांनी मला कधी रागावत तर प्रेम केले त्यामूळेच घडलो असेही बोलताना विद्यार्थ्यांनी सांगितले व गुरूंचे चरण स्पर्श करत त्यांचे आभार मानले.
'पांढरीच्या विठोबाला वाटत भक्तानी यावं' तर माझी शिक्षकांनाही वाटतं विद्यार्थ्यांनी मेळावाच्या निमित्ताने का होईना एकत्र याव असं मेळाव्या प्रसंगी बोलताना माजी प्राचार्य बाबळे सर यांनी भावना व्यक्त केली तर उपस्थिती शिक्षक यांनी प्रगती पतावर पोहचलेल्या विध्यर्थी यांचे अभिनंदन करत आपल्या असणाऱ्या क्षेत्रात उंच शिखर झेप घ्यावीअसा आशीर्वादही दिला.
सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर इ.स१९७० स्थापनेपासुन सण २००२/२००३ या कालावधीतील इयत्ता १० अ चा निकाल १०० टक्के लागला असल्याची आठवण यावेळी करण्यात आली तसेच
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
एक उपक्रम म्हणून या माजी विद्यार्थ्यांनी सोमेश्वर तांत्रीक विद्यालयास नावाचे फलकही दिले.
या प्रसंगी विविध जिल्ह्यातुन आलेले एकूण 35 विद्यार्थी /विद्यार्थिनी तसेच सोमेश्वर विद्यालयाचे माजी प्राचार्य एस डी जगताप , मा.उप.प्राचार्य वाबळे,एस एस कदम,डी एस कदम,बी बी घाडगे, पालखे सर,बी बी कदम,निंबाळकर सर, व्ही डी सकुंडे,ए बी गायकवाड,पी बी जगताप, देवीदास काळखैरे,एस ए जगताप मॅडम इत्यादी शिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोपट माने, अनुमोदन- गणेश कदम तर सुत्रसंचालन किरण भोसले आणि आभार मंगेश गायकवाड,निवेदन- मोहन ओझर्डे यांनी केले. त्याच बरोबर विशेष सहकार्य यशस्वी कार्यक्रमासाठी सागर शिंदे,विजय येवले, अजित गायकवाड, सुचेन्द्र सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.