पुरंदर ; नीरा येथे सरपंच तेजश्री काकडे यांचे कडून पीएमपीएल बसचे स्वागत.
नीरा : हडपसर ते नीरा दरम्यान सुरू झालेल्या पीएमपीएल च्या पहिल्या बसचे नीरा येथे सरपंच तेजश्री काकडे यांनी औक्षण करून स्वागत केले. यावेळी निरेकर नागरिकांनी मोठ्या उत्साहात या बसचे स्वागत केले. या बसच्या स्वागतासाठी सकाळ पासूनच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
पुरंदर तालुक्यातील बहुप्रतिक्षीत हडपसर ते नीरा या मार्गावर पीएमपीएलची बससेवा सुरू करण्यात
आली आहे. भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या अनेक नेते कार्यकर्ते व नागरिकांनी ही बस सुरू करण्याची
मागणी केली होती. खासदार गिरीश बापट व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनंतर दिनांक २१ जानेवारीपासून ही बस सुरू करण्यात
आली आहे. नीरा येथे दुपारी अडीच वाजता या बसचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सरपंच
तेजश्री काकडे व महिला सदस्यांनी बसचे औक्षण केले, तर उपसरपंच राजेश काकडे यांनी चालक व वाहक यांना पूर्ण पोशाख देऊन त्यांचे स्वागत
केले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य राधा माने, वैशाली काळे, माधुरी वाडेकर अभिषेक भालेराव, अनंता शिंदे, अनिल चव्हाण, मार्केट कमिटी संचालक विजय शिंदे, माजी उप सरपंच दिपक काकडे, पंचायत
समिती सदस्या सुनिताकाकी कोलते,सुनिता भादेकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब उर्फ प्रदीप
खाटपे, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, निरेचे माजी उपसरपंच कुमार मोरे, दीपक काकडे,
भाजपचे माजी राज्य परिषद सदस्य अशोक रणदिवे, राजेश चव्हाण,महाराष्ट्र क्रांती सेनेचे तालुका अध्यक्ष
महेश बाबर, अॅड. आदेश गिरमे,काँग्रेसचे जावेद शेख, गणेश जगताप यांसह अनेक नागरीक उपस्थित होते.यावेळी भाजपचे बाळासाहेब भोसले, योगेंद्र माने, सचिन लंबाते,काका निगडे इत्यादी हडपसर ते नीरा बस प्रवास करून नीरा येथे आले.वाल्हे, पिसुर्टी, जेऊर फाटा, पिंपरे गावं याठिकाणीसुद्धा नागरिकांनी मोठ्या उत्साहात या बसचे स्वागत केले.