बारामती ; आदेश देऊनही सुट्टीच्या दिवशी वाहनांची तपासणी नाहीच...
बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनांच्या योग्यता प्रमाण पत्रांची तपासणी करण्यासाठी राज्याचे परिवहन आयुक्त व उपआयुक्त यांनी आदेश देऊनही सुट्टीच्या दिवशी वाहनांची तपासणी नाहीच...
बारामती- बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मोटार वाहन निरीक्षक यांचे संख्याबळ मोठ्या प्रमाणात असतानाही वाहनांच्या योग्यता प्रमाण पत्रांची ऑनलाईन अपायमेंट एक ते दोन महिन्यानंतरची मिळत आहे.आणि त्याही दररोजचा कोठा फक्त पंचविस २५ वाहनांचाच असल्याने दररोज फक्त २५ वाहनांच्याच ऑनलाईन अपायमेंट मिळालेल्या वाहनांच्या योग्यता प्रमाण पत्रांची तपासणी करण्यात येत आहे.
याबाबतची माहिती राज्याचे परिवहन आयुक्त यांना दिल्या नंतर त्यांनी व राज्याचे उपआयुक्त यांनी बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधुन समंधीत अधिकारी यांना सुट्टीच्या दिवशी शनिवार व रविवार रोजी वाहनांच्या योग्यता प्रमाण पत्राची तपासणी करण्याचे आदेश दिले.मात्र शनिवार दिनांक १५ जानेवारी रोजी समंधीत मोटार वाहन निरीक्षक यांनी त्यांच्या ड्युटी मधील शुक्रवारी राहिलेल्या १५ पंधरा वाहनांची तपासणी पूर्ण केली.मात्र सुट्टीच्या दिवशी शनिवारी व रविवारी येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी राज्याचे परिवहन आयुक्त व उपआयुक्त यांनी आदेश देऊनही बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकड़ून वाहनांच्या योग्यता प्रमाण पत्रांची तपासणी का ? करण्यात आली नाही.हे मात्र वाहन मालक,चालक यांना समजु शकलेले नाही.
याउलट मात्र बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधला असता समंधीत अधिकारी म्हणतात की,सुट्टीच्या दिवशी वाहने येत नाहीत.परंतु याबाबतची माहीती वाहन मालक यांना दिली गेली तरच वाहने तपासणीसाठी येऊ शकतात.असे वाहन मालक सांगतात. तसेच दोन महिन्या नंतरची ऑनलाईन आपायमेंट येत असल्याने यदा कदाचित वाहनाचा अपघात झाला तर समंधीत वाहन मालकाला वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट नसल्याने वाहनाचा विमा इन्शुरन्स असूनही नुकसान भरपाई, क्लेम मिळत नाही.तसेच सदर वाहन आरटीओ यांच्या भरारी पथकाने पकडले तर फिटनेस सर्टिफिकेटची मुदत संपली असल्याने व फिटनेस सर्टिफिकेट व्हँलिड नसल्याने हजारों रूपयांचा नाहक दंड भरावा लागतो.त्यामुळे वाहन मालक अडचणीत आल्याचे सांगत आहेत.
एक्सेप्ट मध्ये विना अपायमेंट असणाऱ्या त्यांच्या खास ठराविक समंधीतांच्या वाहनांची तपासणी करावयाची असल्यास व त्या वाहनांची कसलिही ऑनलाईन अपायमेंट नसताना सुद्धा व वाहन कितीही खराब असो, त्या वाहनाचे टायर गोटा झालेले असो,किंवा एखाद्या वाहनाचे नॅशनल परमिटचे एबीएसचे किट नसो, तरी सुद्धा त्या वाहनांच्या योग्यता प्रमाण पत्राची तपासणी करुण त्याचे फिटनेस सर्टिफिकेट तत्काळ दिले जाते.व त्या करीता दुपार नंतर एका मोटार वाहन निरिक्षकांची नियुक्ती बारामती कार्यालायातुन केली जाते.व वाहनांच्या योग्यता प्रमाण पत्राची तपासणी करुण दिली असल्याचे या कोरोना संकटात भरकटुन निघालेले वाहन मालक,चालक सांगतात.
राज्याचे परिवहन आयुक्त व उपआयुक्त यांनी मंगळवार दिनांक ११ जानेवारी २०२२ रोजी बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रत्यक्ष फोनवर समंधीत अधिकारी यांच्याशी संपर्क साधुन सुट्टीच्या दिवशी शनिवार व रविवार रोजी वाहनांच्या योग्यता प्रमाण पत्राची तपासणी करण्याचे आदेश देऊनही शनिवारी दिनांक २१ जानेवारी व रविवारी दिनांक २२ जानेवारी रोजी वाहनांच्या योग्यता प्रमाण पत्राची तपासणी करण्यात आली नाही. राज्याचे परिवहन आयुक्त व उपआयुक्त यांनी दिलेल्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षदा दाखवल्या जात असल्याचे वाहन मालक,चालक सांगतात.
या उलट मात्र ज्या वाहन मालकांच्या गाड्या कितीही नियमात,फिट असल्या तरी सुद्धा कसलेही कारण काढून त्या गाड्या फेल केल्या जात असल्याचे बारामती,दौंड,इंदापुर तालुक्यातील वाहन मालक,चालक सांगतात. याची सत्यता तपासण्यासाठी वाहनांच्या योग्यता प्रमाण पत्रांची तपासणी करीत असताना न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार केले जाणारे व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग तापसण्यात यावे.सर्व सत्य समोर आल्याशिवाय राहणार नाही.अशीही मागणी वाहन मालक,चालक करीत आहेत.
याबाबत एखाद्या सुज्ञ नागरीकाने राज्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे रितसर तक्रार केलीच तर त्यांच्यावर संगनमताने ३५३ ची खोटी पोलीस केस करण्याची धमकी सुद्धा बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक देत असल्याचे वाहन मालक,चालक सांगतात.या बाबत बारामती तालुक्याचे लोकप्रतिनिधी व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लक्ष घालून वाहन मालक,चालक यांना दिलासा द्यावा.अशी मागणी वाहन मालक,चालक करीत आहेत.
कोट
याबाबतची माहिती समंधीत मोटार वाहन निरीक्षक
यांच्याकडून घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल.
नंदकिशोर पाटील
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती