मु.सा.काकडे महाविद्यालयातील प्रा.शिल्पा कांबळे व प्रा.नीलिमा देवकाते यांचे सेट परीक्षेत यश.
सोमेश्वरनगर- बारामतीतील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयातील वरिष्ठ विभागात काम करणाऱ्या प्रा. शिल्पा कांबळे व प्रा. नीलिमा देवकाते यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे.
प्रा.शिल्पा कांबळे सूक्ष्म जीवशास्त्र या विषयाच्या प्राध्यापिका असून महाविद्यालयात गेली दहा वर्ष काम करीत असून त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्र या विषयातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नोव्हेंबर 2021 मध्ये झालेल्या परीक्षेत यश संपादन केले आहे.
प्रा.नीलिमा देवकाते या वरिष्ठ महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवी (एम. ए) च्या वर्गांना अध्यापनाचे काम करीत असून त्यांनी मराठी विषयातून सेट परीक्षा उत्तीर्ण केले आहे.
याबद्दल महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश काकडे- देशमुख, व्यवस्थापन समितीचे सचिव प्रा. जयवंतराव घोरपडे, सहसचिव सतीश लकडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास वायदंडे व सर्व विभागाचे उपप्राचार्य व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.