मुर्टीतील ए टी एम.मशीन फोडून चोरट्यांनी ४ लाख रुपये पळवले.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील मुर्टी येथील निरा मोरगाव रोडवर असलेले ए.टी.एम.मशीन फोडून चक्क ए.टी.एम.मशीन मधून ४ लाख ११ हजार ५०० रुपये चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पो स्टे गु.र.नं :- १९/२०२२ भा.द.वी. ३८० नुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार रविवार दि १६ रोजी रात्री ८:३० ते पहाटे २:११ च्या दरम्यान ही चोरी झाली असल्याचे समोर आलंय. बारामती तालुक्यातील मुर्टी गावं येथील निरा मोरगाव रोडवर असलेल्या अरविंद चव्हाण यांच्या गाळ्यातून टाटा इंडिकॅशन कंपनीचे ए.टी.एम.मशीन फोडून त्यामध्ये असलेले एकूण ४ लाख ११ हजार ५०० रुपये किंमतीचा मुददेमाल अज्ञात चोरट्यानी चोरून नेहला आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध वडगाव पोलीस ठाण्यात मध्ये गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास वडगाव निंबाळकर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारंजेपूल क्षेत्रचे पो स ई योगेश शेलार हे पुढील तपास करत आहेत.