'ती' ऐतिहासिक आठवण, म्हणून भारतीय सैन्य दिवस केला जातो
आजी माजी सैनिक संघटना सोमेश्वरनगर येथे
भारतीय सैन्य दिवस साजरा.
सोमेश्वरनगर - भारतात दरवर्षी 15 जानेवारीला 'सैन्य दिवस' (Army Day) साजरा केला जातो.या दिवशी 1949 साली फील्ड मार्शल जनरल करियप्पा (General KM Cariappa) यांनी भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारली होती.
भारतीय लष्करातर्फे आज 74 वा सैन्य दिवस साजरा केला जातोय. देशात दरवर्षी 15 जानेवारीला सेना दिवस साजरा केला जातोय.
आजी माजी सैनिक संघटना सोमेश्वर नगर मुख्य शाखा बारामती तालुका यांच्या वतीने शनिवार दि 15 रोजी सोमेश्वर येथे असणाऱ्या सैनिक संघटना कार्यालयात हा दिन सर्व सैनिक उपस्थित त्यांना मानवंदना व शहीद जवानांना पुष्पहार अर्पण करत साजरा करण्यात आला या प्रसंगी सोमेश्वरनगर परिसरातील आजी-माजी सैनिक संघटनेचे बांधव उपस्थित होते