जेजुरी - महाराष्ट्र प्रशासनाच्या सेवेत काम करत असताना सर्व सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्याला योग्य तो न्याय देण्याचे काम केले असल्याचे उपजिल्हाधिकारी (पुरवठा विभाग) सचिन ढोले साहेब यांनी दैनिक पुण्यनगरी च्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले,या पदावर काम करीत असताना कोणताही गर्व, अभिमान न बाळगता आलेल्या नागरिकांना हेलपाटे व ताटकळत न ठेवता योग्य तो न्याय दिला असल्याचे त्यांनी सांगितले, असेच काही कामानिमित्त अनिल धायगुडे, रमेश लेंडे, महादेव वाघमोडे, सुनील लेंडे आदि उपजिल्हाधिकारी ढोले साहेब यांच्या कडे गेले असता त्यांना योग्य ते मार्गदर्शन करुन त्यांना हेलपाटे व ताटकळत न ठेवता त्यांचे काम मार्गी लावले एक साधा सरळ अधिकारी भेटला असल्याचे समाधान यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते याप्रसंगी तिघांनीही सचिन ढोले साहेब यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला व पुढील काळात पदोन्नतीसाठी सुयश चिंतले