चौधरवाडी येथील श्री भवानी माता मंदिराचा पायाभरणी कार्यक्रम संपन्न..
फोटो ओळ - मंदिर पायाभरणी शुभारंभ करताना पुणे जिल्हा बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे व इतर मान्यवर.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील चौधरवाडी येथील श्री भवानी माता मंदिराचा पायाभरणी कार्यक्रम बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषद चे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रमोद काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमेश्वर सहकारी साखर कारखाना,अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप , बारामती तालुका सह दुध संघ अध्यक्ष संदीप जगताप, बारामती सभापती पंचायत समिती नीता फरांदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी बोलताना होळकर यांनी पक्षाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. सभापती प्रमोद काकडे व अध्यक्ष जगताप यांनीही याकामी मदत जाहीर करून निधी उपलब्ध करून मंदिर प्रशस्थ होण्यासाठी आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले. उपस्थित सर्व मान्यवरांनी आपली मदत जाहीर करून या कामी खारीचा वाटा उचलला. साखरे उद्योग समूहाचे अध्यक्ष दीपक साखरे यांनी या कामी लागणारे दगडी डबर व क्रश विनामोबदला देऊन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले . सोमेश्वर उद्योगसमूहाचे अध्यक्ष संतोष कोंडाळकर यांनी मंदिराची दिपमाळ उभी करण्याची जबाबदारी स्वीकारून मदत करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक युवा कार्यकर्ते शशांक पवार यांनी केले. विकास पवार यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. या शुभारंभ प्रसंगी चौधरवाडी ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच सदस्य तसेच सोमेश्वरनगर पंचक्रोशीतील ग्रामस्थ मान्यवर व युवक उपस्थित होते