करंजेपुल येथे बाजार दिवशी वाहतूक कोंडी नित्याचीच;संक्रात निमित्त गर्दी चे प्रमाण दुप्पट.
सोमेश्वरनगर - देशातील अनेक खेडोपाडी आजही आठवडयातील एक दिवस आठवडा बाजार भरतो. गावखेडयातील नागरिक या बाजारात जाऊन कोणतीही जीवनावश्यक वस्तू खरेदी करतात.
करंजेपुल(ता बारामती) येथील मंगळवारी असणाऱ्या आठवडे बाजार दिवशी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामध्ये सोमेश्वर चा गळीत हंगाम चालू असल्याने ऊस वाहतूक करणारी ट्रक ट्रॅक्टर व बैल जोडी वाहने चालू असून इतर वाहने खूप प्रमाणात आहेत यामध्ये हाकेच्या अंतरावर असणारे वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे अंतर्गत असणारे करंजेपुल दूरक्षेत्र येथील पोलिस कर्मचारी यांचा सहभाग दिसत नसल्याने बाजार निमित्त आलेल्या नागरिकांनी त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे त्यामधून वाट काढत व गर्दीला स्थिरस्थावर करताना स्थानिक नागरिकांची मात्र दमछाट होत आहे काही ठिकाणी वादही झालेले आहेत. झालेल्या मोठ्या प्रमाणात गर्दी मुळे चोरी,अघटित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही असे नागरिकांनी बोलताना व्यक्त केली.