Type Here to Get Search Results !

शिरसाई माता मंदिरातील दागिणे चोरणाऱ्यास २४ तासाच्या आत केली अटक,१२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत.

शिरसाई माता मंदिरातील दागिणे चोरणाऱ्यास २४ तासाच्या आत केली अटक,१२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत.   
बारामती - बारामती तालुका पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरसाई माता मंदिरातील दागिणे चोरणा-या पती पत्नी व मेव्हणीस २४ तासाच्या आत केली अटक, महाराष्ट्रातील जवळपास २० ते २५ मंदिरामधील चोरीचे गुन्हे उघडकीस लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत  दिनांक ८/१/२०२२ रोजी रात्री १ ते ३ वाजताच्या दरम्यान बारामती तालुका पोलीस ठाणे हृददीतील शिसुफळ गावी असलेल्या शिरसाई मंदिरातील देविच्या अंगावरील दागिणे व मंदिरातील इतर वस्तु चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली होती. सदर बाबत बारामती तालुका पोलीस ठाणे येथे गु.र. क ११/२२ भादवि कलम ३८०,४५७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर घटनेचे गांभिर्य ओळखून मा. पोलीस अधिक्षक पुणे प्रा. श्री. अभिनव देशमुख सो, अप्पर पोलीस अधिक्षक श्री मिलींद मोहीते सो उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे सो यांनी तपासाबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या, त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक ढवाण व पोलीस ठाणतील अधिकारी, गुन्हे शोध पथकातील अमलदार, तसेच इतर पोलीस स्टाफसह घटनास्थळी जावून वेगवेगळ्या टिम मनवून शिर्सुफळ, मळद, कुरकुभ, दौंड, बारामती आसपासच्या परिसरातील जवळपास ६० ते ६५ सीसीटिव्ही कॅमे-याच्या फुटेजची पाहणी केली. परंतू रात्रीची वेळ असल्याने आरोपीत यांनी वापरलेल्या वाहनाचा नंबर समजण्यास अनेक अडचणी येत होत्या, परंतू पोलीस पथकाने वेगवेगळ्या कुलप्त्या वापरून आरोपींनी वापरलेल्या इको वाहन क. एम.एच १४ एफ एक्स ४५७६ चा नंबर मिळाला. त्याप्रमाणे पोलीस पथक सदर वाहनाच्या मालका पर्यंत पोहचले असता सदर इको वाहन मालकाने त्याचे वाहन दिनांक ४/१२/२०२९ रोजी पिंपरी येथून चोरीस गेले असून त्याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे आरोपींचा शोध घेणे आणखी जिकरीचे झाले परंतु तपास पथकाला तांत्रिक बाबीवरून आरोपीत हे गोकुळ शिरगाव ता. करविर, जि. कोल्हापूर येथे असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पथकाने गोकुळ शिरगाव, ता करविर, जि. कोल्हापूर येथून आरोपीत राहत असलेल्या घरातून सापळा आरोपीतांना ताब्यात घेतले. रचून खालील  १) शाहरूख राजु पठाण वय २४ वर्षे रा. गोपाळ शिरगाव, नॅशनल हायवे ४जवळ, जि. कोल्हापूर, मुळगाव शिव तकारवाडी, निरा ता. पुरंदर जि. पुणे  (२) पुजा जयदेव मदनाळ वय १९ वर्षे रा. रा. गोपाळ शिरगाव, नॅशनल हायवे ४ जवळ, जि. कोल्हापूर, मुळगाव जुनाबिडी कुंभारी सोलापुर जि. सोलापुर ३) अनिता गोविंद गजाकोश वय १९ वर्षे रा. गोपाळ शिरगाव, नॅशनल हायवे ४ जवळ, जि. कोल्हापूर, मुळगाव- गोलघुमट शिवाजी चौक विजापुर जि. विजापुर राज्य कर्नाटक यातील आरोपीत कर व २ हे पती-पत्नी असून आरोपी क.३ मेव्हणी आहे. सदर आरोपीतांना पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हयाची कबुली देवून त्यांना शिरसाई माता मंदिरात चोरी सह नागपूर, वर्धा, लातूर, बीड, उस्मानाबाद, सातारा, कोल्हापूर जिल्हयातील वेगवेगळया जवळपास २० ते २४ मंदिरातील दागिणे व इतर साहित्य चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींना सदर गुन्हयात करण्यात आली असून मा.न्यायालयाने त्यांना अटक  दिनांक १५/२/ २०२२ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिले आहे. यातील अटक आरोपी शाहरूख पठाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी भोसरी पो.ठाणे. समर्थ पो. ठाणे फरासखाना पो. ठाणे येथे वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.  आरोपीताकडून आता पर्यंत शिरसाई माता मंदिरात चोरीस सर्व दागिणे व पितळी वस्तू सह महाराष्ट्रातील इतर मंदिरातून चोरी केलेले दागिणे, वस्तू तसेच पिंपरी येथून चोरी केलेली इको वाहन क. एम. एवं १४ एफ एक्स ४५७६ सह जवळपास १२ लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.  सदरची कामगिरी मा. मा.पोलीस अधिक्षक पुणे ग्रामिण  अभिनव देशमुख सो अप्पर पोलीस अभिक्षक  मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी  गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार रमेश भोसले, पोलीस अमलदार नंदु जाधव, राहुल पांढरे, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, रणजीत मुळीक, अमोल नरुटे, मंगेश कांबळे, चालक बापू गावडे यांनी 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test