Type Here to Get Search Results !

संजय गांधी निराधार योजनेची 230 प्रकरणे मंजूर

संजय गांधी निराधार योजनेची 230 प्रकरणे मंजूर
बारामती, दि. 28:-  संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी निवडीसाठी 28 जानेवारी 2022 रोजी प्रशासकीय भवन बारामती  येथे झालेल्या बैठकीत 230 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.
             समितीचे अध्यक्ष धनवान वदक यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत नायब तहसिलदार महादेव भोसले, समितीचे सदस्य सुनिल बनसोडे, शिवराज माने, शहाजी दळवी, निलेश मदने, प्रविण गालिंदे, जिवना मोरे,  नुसरत इमामदार आदी उपस्थित होते. 
            बैठकीत एकूण 252 अर्जाची छाननी करण्यात आली.  यामध्ये संजय गांधी योजनेच्या 167 प्राप्त अर्जापैकी  159 मंजूर तर  8 अर्ज नामंजूर करण्यात आले.  श्रावणबाळ योजनेचे 74 प्राप्त अर्जापैकी 60 अर्ज मंजूर तर 14 अर्ज नामंजूर करण्यात आले. इंदिरा गांधी योजनेचे सर्व  प्राप्त  11 अर्ज मंजूर करण्यात आले. 
                                       

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test