Type Here to Get Search Results !

सोमेश्वर विद्यालयात सन 1999/2000(10 अ) च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न..

सोमेश्वर विद्यालयात सन 1999/2000(10 अ) च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न..
सोमेश्वरनगर - बारामतीतील सोमेश्वरनगर मध्ये असणाऱ्या सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर येथे तब्बल 20 वर्ष्यानी  सन - 1999/2000 (इयत्ता 10 अ) च्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आनंदात संपन्न झाला.  मेळाव्यास विविध जिल्हा तालुक्यातून माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या ते विद्यार्थी आत्ता  राजकीय, सामाजिक ,शिक्षण तसेच डॉक्टर, वकील व्यावसाईक अश्या विविध क्षेत्रात आपला ठसा उमठवत आहे  . विशेष म्हणजे हे विद्यार्थी एकत्र येत त्यांनी  ज्या शाळेत आपण शिकलो त्या सोमेश्वर विद्यालयास त्या नावाचा आकर्षक फलक कायमस्वरूपी आठवण राहावी म्हणून  भेट दिला यांचा आनंद त्या सर्वांच्या चेहऱ्यावर ओसंडत होता.निमंत्रित शिक्षकांना त्यांना शाल पुष्पगुच्छ श्रीफळ देत त्यांचा आशीर्वाद घेत जमलेल्या विद्यार्थ्यांनी आपले कर्तव्य बजावले, एक शाळेविषयी सुरुवातीस सर्व एकत्र येत आपण ज्या वर्गात दहावी बसायचो त्या वर्गात जात जुन्या आठवणींना उजाळा दिला व ते दहावीतील असणारे दिवस आठवताच त्या आठवणी ताज्या झाल्या,
या बॅच च्या विद्यार्थ्यांनी  सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर येथे नवीन हायस्कुल येथे नावाचा फलक देत आपले ऋण फेडत अतिशय सुंदर काम केल्याने या दिवश  माजी विद्यार्थी आले असताना त्यांनी ही या बॅच सन 1999/2000 (इयता 10 अ)  याचे अनुकरण करून काहीतरी शाळेसाठी आपण देणं लागतो हे मनी ठेवत त्यांनी असा उपक्रम राबवावा असेही आलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्यास तील विद्यार्थी यांनी संगितले.तर शाळाउपयोगी असे उपक्रम प्रत्येक वर्षी राबवनार असल्याचेही त्यांनी सांगितले.
     या मेळाव्या प्रसंगी शाळेतील आजी माजी शिक्षक म्हणून एस.डी जगताप ,एस पी जगताप ,एस के वाबळे,ए एम रणवरे ,एस एस कदम,आर जी निंबाळकर ,बी.बी कदम,संजय कदम, ए एम साळुंके
 व विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test