श्री सोमेश्वर कामगार पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अजित शिंदे तर उपाध्यक्षपदी संजय लकडे
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कामगार परसंस्थेच्या अध्यक्षपदी अजित श्रीकांत शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी संजय मारुती लकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आज संचालक मंडळाच्या मासिक सभेत अध्यक्षपदासाठी शिंदे यांचा तर उपाध्यक्षपदासाठी लकडे यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवड करण्यात आली. या वेळी बाळासाहेब काकडे, बाळासाहेब गायकवाड, तानाजी सोरटे, धनंजय खोमणे, संतोष भोसले, विलास दानवले माजी अध्यक्ष पंढरीनाथ राऊत उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजेंद्र देवकाते यांनी काम पाहले, नवनिर्वाचित अध्यक्ष शिंदे यांनी सर्वांचे आभार मानत जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या कामगार परसंस्थेच्या हिताचे व कामगार बांधूना न्याय देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील .