...तिची रांगोळी ठरली सोमेश्वर भाविकांचे आकर्षण ; तर कौतुकांचा झाला वर्षाव.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी - कुटूंब सुरक्षा ,आरोग्यासाठी आलेल्या अडीअडचणी दुर होण्यासाठी महिला वर्ग "सोळा सोमवार" नावाचे व्रत म्हणजे लागोपाठच्या सोळा सोमवारांना केलेला उपास. हे शंकराचे व्रत शीघ्र फलदायी होण्यासाठी करत असते - असे सांगितले जाते. ... १६ सोमवार व्रत केल्यावर येणाऱ्या १७ व्या सोमवारी व्रताचे उद्यापन बारामतीतील सोरटेवाडी येथील विजय शिरतोडे व त्यांच्या पत्नी सारिका यांनी प्रसिध्द श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे १६ विवाहित जोडींना भोजन स्वरूपी प्रसाद देत हे व्रत आनंद समाधानात पार पडले,या प्रसंगी त्यांची कन्या साक्षी हिने मंदिर परिसरात अप्रतिम शिवस्वरूप रांगोळी रेखाटली यासाठी मावशी संगीता माकर यांनी विशेष सहकार्य केले होते ,सोमवार निमित्त सोमेश्वर पंचक्रोशीतील भाविक सोमेश्वर शिवलींग दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असतात त्यावेळी आलेल्या भाविकांनी तिच्या सुरेख रांगोळी चे कौतुक करत त्याचे फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.
जगावर असणारे कोरोनाचे संकट कमी झाले असल्याने सर्वत्रच मंदिरे धार्मिक विधी, दर्शनासाठी खुली केलेली असल्याने सोमेश्वर मंदिर हेही दर्शनासाठी खुले असून येथे दर सोमवारी शिवभक्तांची दर्शनासाठी मोठया संख्येने गर्दी करत असते.