सहकार विकास पॅनेलची प्रचारात आघाडी;मतदारांचा प्रचंड प्रतिसाद
जेजुरी प्रतिनिधी - पुरंदर तालुक्यातील आदर्श गाव मौजे धालेवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असुन येत्या बारा तारखेला मतदान होणार आहे येथील माजी आदर्श सरपंच संभाजी नाना काळाणे यांच्या सहकार विकास पॅनेलने प्रचारात आघाडी घेतली असून गावातील मतदार व नागरीकाचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे माजी आदर्श सरपंच संभाजी काळाणे यांनी हि सोसायटी स्थापन केली असुन पुरंदर तालुक्यात सतत वसुली बाबतीत प्रथम क्रमांक मिळवणारी हि एकमेव संस्था आहे परंतु काही विरोधकांनी यात आडकाठी आणून कायम बिनविरोध होणारी सोसायटी आज निवडणुकीच्या भोवऱ्यात अडकवली आहे परंतु सुज्ञ मतदार विरोधकांना त्यांची योग्य जागा दाखवल्या शिवाय रहाणार नाहीत सहकार विकास पॅनेलचे सर्व बारा उमेदवार निस्वार्थी, शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, शुद्ध चारित्र्याचे असुन सेवा भावी काम करणारे आहेत अशा उमेदवारांना प्राधान्य देऊन त्यांना निवडून द्यावे असे आवाहन माजी आदर्श सरपंच संभाजी नाना काळाणे यांनी केले आहे