निधन वार्ता ; मूळ करंजेगावचे माजी सरपंच हनुमंतराव बाबुराव शेंडकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजेपुल-शेंडकरवाडी गावचे जेष्ठ , मूळ करंजेगावचे माजी सरपंच हनुमंतराव बाबुराव शेंडकर यांचे वृद्धपकाळाने शेंडकरवाडी येथील राहत्या घरी गुरुवार दि ३० डिसेंबर रोजी निधन झाले.
त्यांचा पश्चात पत्नी नर्मदा, एक विवाहीत मुलगी,
तीन विवाहित मुले ,नात - नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्याच्या जाण्याने शेंडकरवाडी सह सोमेश्वरनगर परिसरात शोककळा पसरली आहे.
ते करंजे ग्रामीण नागरी पतसंस्थाचे संस्थापक संचालक असून मूळ करंजे एकत्र ग्रामपंचायत चे ( १९८५/१९९२) या कालावधीत सरपंच होते तसेच श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे दर वर्षी असणारा काकड आरती सोहळा मध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग असायचा , माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवारसाहेब यांचे निकटवर्तीय सहकारी होते.
श्री सोमेश्वर कामगार पतसंस्था संचालक जालिंदर शेंडकर,प्रगतशील शेतकरी प्रकाश शेंडकर,करंजेपुल माजी तंटामुक्ती अध्यक्ष महेश शेंडकर यांचे ते वडील होत.