जेजुरीतील विकास कामे गेली वाहुन;ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाची कामे
जेजुरी प्रतिनिधी - जेजुरी नगरपालिकेच्या वतीने शहरात अनेक ठिकाणी विकास कामे जलद गतीने सुरू केली असुन युद्ध पातळीवर तयार करण्यात आलेले डांबरी रस्ते अवकाळी पडलेल्या पावसामुळे वाहून गेले आहेत या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे भारतीय जनता पार्टीच्या अलका शिंदे यांनी सत्ताधारी नगरसेवक व पालीका प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे, नगरपालिका निवडणुका जवळ आल्याने ही विकास कामे घाईघाईने केली जात असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे नागरीकांच्या पैशाची उधळपट्टी करणं थांबवा स्वताच्या टक्केवारी साठी विकास कामे काढू नका येणाऱ्या काळात नागरीक तुम्हाला तुमची जागा दाखवल्या शिवाय राहाणार नाही हे नक्की या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून ठेकेदारांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले