जेजुरी गडावर बानुबाई मंदिराचा होणार जिर्णोद्धार...
धनगर समाज उन्नती मंडळाची मागणी
जेजुरी - अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत तथा होळकर घराण्याचे आराध्य दैवत असलेल्या तीर्थक्षेत्र जेजुरी गडावरील असणारे बानुबाई देवीचे मंदिर जीर्णोद्धार करावे असे निवेदन महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाच्या वतीने देण्यात आले
श्री मार्तंड देवसंस्थान चे प्रमुख विश्वस्त पंकज निकुडे पाटील व विश्वस्त शिवराज झगडे यांना हे निवेदन देण्यात आले
खंडोबा देवाची दुसरी बायको असणा-या बानुबाई देवीच्या मंदिराची दुरवस्था झाली असून मंदिराचा स्लॅप देखील गळत असल्याचे निदर्शनास आले आहे त्याची डागडुजी व रंगरंगोटी करणे आवश्यक आहे काही दिवसांपूर्वी उन्नती मंडळाचे कार्यकर्ते गडावर दर्शनासाठी आले असता त्यांना बानुबाई मंदिराची दुरवस्था झाली असल्याचे पहावयास मिळाले त्या पार्श्वभूमीवर माजी आमदार तथा महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उन्नती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हे निवेदन प्रमुख विश्वस्त यांना दिले यावेळी विश्वस्त शिवराज झगडे यांनी सांगितले की आपल्या पत्राचा संदर्भ घेऊन आम्ही त्वरीत जिल्हा अधिकारी यांना पत्र व्यवहार करुन मंदिराच्या जिर्णोद्धारा साठी पाठपुरावा करु मंदिराच्या जिर्णोद्धार करण्यासाठी पुरातत्व खात्याची परवानगी घ्यावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले, जेजुरी गड विकास आराखडा मंजूर झाला असुन त्या मध्ये बानाई देवीचे मंदिर जुन्या बांधकामास कुठेही धक्का न लावता अतिशय आखीवरेखीव अशा पध्दतीने त्याचा जिर्णोद्धार केला जाईल असे प्रमुख विश्वस्त पंकज निकुडे पाटील यांनी सांगितले याप्रसंगी महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रोहिदास गोरे, पुणे जिल्हा अध्यक्ष अनिल अप्पा धायगुडे, कार्याध्यक्ष रमेश लेंडे, संपर्क प्रमुख महादेव वाघमोडे, सल्लागार अभिमन्यू उघडे,ह. भ.प.बनाजी गोरे, बंडू गोरे,शिवाजी गोरे, फुरसुंगी शहर अध्यक्ष राजेंद्र वारे, सदस्य पैलवान ओमराज गोरे,विराज गोरे आदि मान्यवर उपस्थित होते