सोमेश्वर करंडक २०२१....१७ डिसेंबर रोजी स्पर्धेचे फायनल सामने तालुक्यातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थित होणार.
जाणता राजा मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस करंजे पंचक्रोशी, समस्त ग्रामस्थ करंजे पंचक्रोशी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या ...सोमेश्वर करंडक २०२१ फुल पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा रंगतदार अवस्थेत आहे. शुक्रवार दिनांक १७ डिसेंबर रोजी या स्पर्धेचे फायनल सामने होणार आहेत.
खुप वर्षांनंतर आपण फुल पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा भरवल्या आहेत तरीही या स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेमध्ये बारामती, फलटण, खंडाळा, पुरंदर, दौंड व हवेली तालुक्यातील अनेक क्रिकेट संघांनी सहभाग घेतला होता.
उद्या सेमीफायनल व फायनल असल्याने अनेक नामांकित क्रिकेटपटू सहभागी होणार असल्यामुळे मैदानावर प्रेक्षकांची भरपूर गर्दी होणार आहे. परिसरातील प्रतिष्ठित व्यक्तींनी मैदानावर येऊन वैयक्तिक रोख बक्षिसांची खैरात केली आहे. उद्या ही असेच चित्र पहायला मिळणार आहे. मैदानावर आलेल्या नामवंत खेळाडूंनी येथील केलेल्या सोयीसुविधा बद्दल आयोजकांचे कौतुक केले आहे. आयोजकांनी शिस्तबद्ध पद्धतीने केलेल्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले आहे. उद्या नामांकित पंच म्हणून गाजलेले डॅनी पंचांचे काम करणार आहेत.
परिसरातील क्रिकेट प्रेमींची तुफान गर्दी मागील पाच दिवस झालेली दिसल्यामुळे उद्या सुद्धा अशीच गर्दी होणार असल्याने आयोजकांनी त्या अनुषंगाने चोख व्यवस्था केली आहे.
उद्या बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोदकाका काकडे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संग्रामभाऊ सोरटे, तालुका दुध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, सर्व संचालक मंडळ, परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, सोमेश्वर पंचक्रोशी सर्व गावचे सरपंच उपसरपंच सदस्य उपस्थित राहणार असून सर्वांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ संपन्न होणार आहे.
सर्वांनी उपस्थित राहून क्रिकेट चा मनमुराद आनंद घ्यावा.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
आयोजक.....
सोमेश्वर करंडक २०२१
बुवासाहेब हुंबरे मित्र परिवार
सोमेश्वर स्पोर्ट्स अॅड सोशल क्लब
प्रणाली शिक्षण संस्था
राष्ट्रवादी काँग्रेस करंजे पंचक्रोशी
समस्त ग्रामस्थ करंजे पंचक्रोशी
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
स्थळ - सटवाई मंदिर नजीक मागरवाडी रोड करंजे,