मु.सा.काकडे महाविद्यालय येथे 'करिअर कट्टा' या अभियानाच्या फलकाचे अनावरण.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 'करीयर कट्टा' विभागामार्फत स्पर्धा परीक्षेची तयारी करता येणार.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील मु.सा.काकडे महाविद्यालयात ,महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यत विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या करिअर कट्टा या अभियानाच्या फलकाचे अनावरण मा.किरण गुजर ,जेष्ठ सदस्य बारामती नगर पालिका आणि विश्वस्त विद्याप्रतिष्ठान बारामती, आणि मा. दत्तात्रय येळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या उपक्रमाची माहीती समन्वयक प्रा.डॉ नारायण राजूरवार यांनी दिली.या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयाचे प्राचर्य जवाहर चौधरी यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करीयर कट्टा विभागामार्फत स्पर्धा परीक्षेची तयारी होऊ शकते.प्राचार्य जवाहर चौधरी आणि डॉ नारायण राजूरवार यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आव्हान केले आहे. या प्रसंगी कॉलेज संस्थापक अध्यक्ष सतीश काकडे ,संस्थेचे सचिव प्रा.जयवंतराव घोरपडे, सहसचिव सतीश लकडे , संस्थेचे संचालक भीमराव बनसोडे , महेंद्र जाधवराव, डॉ देविदास वायदंडे, डॉ संजू जाधव , महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.जवाहर चौधरी, डॉ देविदास वायदंडे उपस्थित होते.तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ जगन्नाथ साळवे, डॉ जया कदम ,डॉ प्रवीण ताटे देशमुख,आर .डी .गायकवाड ,तसेच सर्व प्राध्यापक उपस्थित होते