Type Here to Get Search Results !

महत्वाची बातमी ; न्युजपेपरचा वापर खादयपदार्थ पॅकीग साठी करण्यात येवु नये.

महत्वाची बातमी ; न्युजपेपरचा वापर खादयपदार्थ पॅकीग साठी करण्यात येवु नये.
न्युजपेपरचा वापर खादयपदार्थ पॅकीग साठी करण्यात येवु नये. अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ हा महाराष्ट्रासह संपुर्ण देशात दि.
०५/०८/२०११ पासुन लागु करण्यात आला आहे. सदर कायदयाचा प्रमुख उददेश जनतेस सुरक्षित, सकस व निर्भेळ अन्न् उपल्ब्ध करुन देणे हा आहे.
अनेकदा लोकांमार्फत बाहेरुन नाष्टा मागविला जातो त्यावेळी अन्न व्यवसायिक हे वडापाव, पोहे या सारखे अन्न् पदार्थ न्युजपेपरमध्ये बांधुन देतात त्यामुळे जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. तसेच वृत्तपत्राची शाई ही केमिकल पासुन बनविलेली
असते (डाय आयसोब्युटाइल फटालेट आणि डायइन आयसोब्युटाइल) या केमिकलचा वापर वृत्त पत्र छपाईसाठी करतात.

अशा न्युजपेपरमध्ये गरम खादयपदार्थ पॅकींग करणे व ग्राहकांना देणे धोकादायक व ठरत आहे. त्यामुळे भारतीय खादय सुरक्षा मानके प्राधिकरण (FSSAI) भारत सरकार यांनी दि.०६/१२/२०१६ आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. तरी सर्व अन्न् व्यवसायिक छोटे मोठे हॉटेल्स, बेकरी व्यवसायिक, स्नॅक्स सेंटर, स्वीटमार्ट, वडापाव, भजी व भेळ विक्रेते
यांना सुचित करण्यात येते की, न्युजपेपरमध्ये अन्न् पदार्थाचे पॅकींग त्वरीत बंद करावे अन्यथा आपणाविरुध्द अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ नियम व नियमन २०११ अंतर्गत योग्य ती कडक कारवाई घेण्यात येईल याची नोंद घ्यावी.
.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test